सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) _:  येथील हरिओमनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी घरफोडी करून सुमारे २ लाख १७ हजार रुपयांचे दागीने लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. 

या आरोपीने फुलंब्रीसह शिऊर, गंगापूर व पैठण पोलीस ठाणे हद्दीतही चोऱ्या केल्याची कबुली दिली. मंगेश भुग्रा भोसले (वय ५०), दिनेश सखाराम काळे (वय ४५) दोघेही रा. राहटगाव, ता. पैठण असे घरफोड्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. फुलंब्री शहरातील हरिओमनगरातील मञ्जीब मन्नान शेख यांच्या घरातून २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ०२ लाख १७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने चोरीस गेले होते. 

-- या पथकाने केली कारवाई --
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोह कासीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनिल गोरे, पो.अ. बलविरसिंग बहुद्दे, योगेश तरमळे, जिवन घोलप, शिवाजी मगर यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात मञ्जीब शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरविण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपणीय माहितीच्या आधारे पो.नि. विजयसिंग राजपूत यांना सदरची घरफोडी ही मंगेश भुग्रा भोसले, दिनेश सखाराम काळे, अमोल पराठ्या भोसले व पवन कपूर भोसले यांनी केल्याची माहिती मिळाली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासावर निघाले असता असता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे गेवराई जवळील अलाना कंपनीजवळ असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकाने सापळा लावत यापैकी दोघाना ताब्यात घेतले.  चौकशीत पोलिसी खाक्या दाखवताच मंगेश भुग्रा भोसले आणि दिनेश सखाराम काळे यांनी फुलंब्री शहरातील हरी ओमनगर येथे साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय त्यांनी शिऊर पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन, पैठण पोलीसस्टेशन अंतर्गत पाच गुन्ह्याची, चोऱ्यांची कबुली दिली. 

गुन्ह्यातील चोरी गेलेले व त्यांचे हिशाला आलेले २५ हजार रुपये नगदी आणि ३५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागीने असा मुद्देमाल त्यांनी काढून दिला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या आरोपींना वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह अधिक तपासकामी फुलंबी पोलीसठाण्यात हजर करण्यात आले.